कोल्हापुरात नगरसेविकेचा आत्महत्येचा प्रयत्न
प प्रतिनिधी
कोल्हापुर
कोल्हापुर दक्षिणमधील नगरसेविकेने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर शास्त्रीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आले होते. त्यांना आता अति दक्षता विभागातून बाहेर आणले आहे. या नगरसेविकेने चार दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले आहे. या नगरसेविकेने कौटुंबिक वादातून विष प्राषण केले. मात्र, याची पोलिस ठाण्यात नोंद केली गेली नाही आहे.