कोरोनामुळे निम्मा भारत बंद

मुंबई-ठाण्यासह पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे मध्यरात्रीपासून बंद


केंद्र सरकारसह राज्यांनीही कंबर कसली



नवी दिल्ली/मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्यांनीही कंबर कसली आहे. यातच कर्नाटातील कलबुर्गीमध्ये करोनामुळे देशातील पहिला बळी गेल्यानंतर राज्य सरकारं अधिक सतर्क झाले आहेत. उत्तरेतील बहुतेक राज्यांनी ३१ मार्चपर्यंत शाळा, कॉलेज, मॉल्स आणि चित्रपटगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे कोरोनामुळे जवळपास निम्मा भारत बंद झाल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाण्यातील जिम, स्विमिंग पूल आणि नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान, भारतातील करोनाच्या रुग्णांची संख्या ८१ वर गेली आहे. यात ६४ भारतीय तर १६ इटलीचे आणि एक कॅनडाचा नागरिक आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय.


राज्यात करोनाचे १७ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत करोनाबाबतचं निवेदन दिलं. राज्यात करोनाचे एकूण १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, या १७ रुग्णांमधील करोनाची लक्षणे गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. करोनाचा राज्यात फैलाव नाही. मुंबईठाणे, नागपूर आणि पुण्यातही नाहीमात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पुढचे १४ दिवस काळजी घ्यायला हवेत, म्हणून निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे आणि बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक अशी बंद करता येणार नाही. मात्र, नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. कारण असेल तरच प्रवास करा, असं सांगतानाच मॉलमध्ये जाणंही नागरिकांनी टाळावं, असं आवाहन त्यांनी केलं.


___ मुंबईत ४ कोरोनाग्रस्त मुंबईत आणखी एक करोनाबाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांची संख्या चार झाली असून, राज्यातील आकडा १८वर पोहोचला आहे. करोनाबाधित रुग्ण हा घाटकोपर पूर्वे कडील पेट्रोल पंपावरील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पेट्रोल पंप असोसिएशनने ही माहिती दिली. राज्यात करोनाचा धोका वाढला आहे. या विषाणूचा फैलाव वाढू लागला आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या १८वर पोहोचली आहे. दहा हे पुण्यातील आहेत, तर नागपुरात रुग्णांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईत हा आकडा चारवर पोहोचला आहे. घाटकोपरमधील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. __ हॉटेल, रेस्टॉरंट बंद नाही हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉल बंद करण्यात आलेले नाही. मात्र, लोकांनी ठिकाणी जाणं टाळावं, असं सांगतानाच आम्हाला व्यवसायापेक्षा जनतेच्या जिवीताची काळजी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे, बस सेवा बंद करता येणार नाहीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी बस आणि रेल्वे सेवा थांबवा अशीही मागणी होती. परंतु, हटवणार YES BANK 'चला हवा येऊ द्या'च्या प्रतिनिधी या अत्यावश्यक सेवा आहेत. सर्वांना पॅनिक करून आवश्यक सेवा बंद करता येणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


लग्नात गर्दी टाळा सध्या लग्न सराईचे दिवस आहे. मात्र नागरिकांनी लग्न समारंभामध्येही काळजी घ्यावी. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले. वर्क फ्रॉम होम करा यावेळी त्यांनी खासगी कंपन्यांनाही महत्त्वाच्या सूचना केल्या. खासगी कंपन्यांनी जिथे जिथे शक्य आहे, तिथे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सविधा द्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. तसेच क्रिडा, सभा, मेळावे, समारंभ आदी गर्दीचे कार्यक्रम घेण्यात येऊ नये. या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांना संबंधित शासनाकडून परवानगी देण्यात येणार नाही. ज्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या परवानग्या रद्द करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 'त्या' सात देशातील रुग्ण नाही चीन, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, इटली, स्पेन आणइ इराण या सात देशांना केंद्र सरकारने करोनाबाधित जाहीर केलं होतं. पण आपल्याला सापडेलेले १७ रुग्ण हे या सात देशांतून आलेले नाहीत. तर अमेरिका आणि दुबईतून आलेल्या या रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे करोना बाधित देशांच्या यादीत अमेरिका आणि दुबईचा समावेश करण्याची केंद्र सरकारला सूचना करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच १५ फेब्रुवारीनंतर या सात देशांना भेटी देणाऱ्या आणि शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत मायदेशात येणाऱ्या लोकांना विलगीकरण कक्षात न ठेवता अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


डोंबिवली, ठाण्यातील गुढीपाडव्याच्या सर्व शोभायात्रा रद्द


डोंबिवली, ठाण्यात यावेळी गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. करोना व्हायरसच्या दहशतीमुळे हा निर्णय घेण्यात आला. डोंबिवली आणि ठाणे येथील सगळ्या शोभायात्रा करोनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. २२ वर्षांची परंपरा यामुळे खंडीत होणार आहे. ठाणे जिल्ह्यातल्याही सगळ्या स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागतयात्रा संयोजकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी या शोभायात्रा रद्द केल्याची माहिती दिली. २२ वर्षापासून डोंबिवलीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. मात्र करोनाच्या दहशतीमुळे यावर्षी शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मास्क आणि सॅनिटायझर आता अत्यावश्यक वस्तू


आता अत्यावश्यक वस्तू कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे. यामुळे मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांवर आळा घालण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतही करोनाचे रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी सॅनिटाझर आणि मास्क पुरविण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळांमध्ये सॅनिटाझरचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबईत करोनाचे तीन रुग्ण आढळले असून पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १०वर गेली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी, शाळा, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर स्थानकांवरही सॅनिटायझर आणि मास्क पुरविण्यत येणार आहेत. शाळांमध्ये सॅनिटायझर देण्यात येणार असून मास्क पुरविण्याबाबतचाही विचार सुरू असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत करोनाचे रुग्ण आढळल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून शाळांना तात्काळ सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी केली आहे. शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जमतात. शिवाय मुलांमध्ये जागृतीचे प्रमाण तेवढं नसतं आणि आजाराबाबतचं गांभीर्यही नसतं. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्ट्या जाहीर कराव्यात, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे. तर मुंबईतल्या एका शाळेने परिक्षा न घेताच शाळांना सुट्ट्या दिल्याचे सूत्रांनी सांगितले.