मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) समर्थन केले नसल्याचं सांगितले आहे. आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. माझे सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असं म्हणालो होतो. पण याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असे राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पदाधिकार्यांची बैठक बोलावण्यात आली होती. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देण्यासंबंधी मनसे पदाधिकार्यांमध्ये मतांतर असून नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 
सीएएला समर्थन नाहीः राज ठाकरे