नरडवे धरणग्रस्तांनी पालकमंत्र्यांना दिले निवेदन उदय सामंतांकडून मोठा दिलासा

कणकवली : नरडवे धरणग्रस्तांनी 10 फेब्रुवारी 2020 रोजी संदेश पारकर यांची भेट घेउन त्यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग चे पालकमंत्री उदय सामंत यांची शासकीय विश्राम गृह कणकवली येथे भेट घेऊन नरडवे धरणग्रस्तांनी निवेदन दिले. पालकमंत्री यांनी एक मोठा दिलासा दिला आहे, त्यांनी सांगितले की कलेक्टर व संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्याशी बसून आढावा मिटींग घेतली जाईल, पोलीस बंदोबस्त काढून घेतला जाईल, तसे धरणाची पाहणी केल्यानन्तर व धरणग्रस्तांना विश्‍वासात घेतल्याशिवाय पुढील धरणाची कामगिरी करता येणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत.
नरडवे धरणग्रस्त समन्वय समिति मुंबई या समितीचे अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ, मारुती ढवळ, त्याचबरोबर संलग्न असलेली गावची समितीचे पदाधिकारी लुईस डीसोजा, गणेश ढवळ, प्रकाश सावंत, प्रभाकर ढवळ, वैभव नार्वेकर, अजय नार्वेकर, चंद्रकांत नार्वेकर  सत्यवान कोळगे, विनायक कोळगे, चंद्रकांत कदम, तसेच भेर्देवाडी, तांबळवाडी, घोलाणवाडी, दुर्गवाडी या विभागातून अनेक शूरवीर पदाधिकारी आणि झाशीच्या राणी सारख्या असणार्‍या आया बहिणी असे मिळून 150 च्या वर प्रकल्पग्रस्त आवर्जून कणकवली येथे उपस्थित होत्या. अन्यायाच्या लढाईचा हा एकंदरीत विजय आहे, असे धरणग्रस्तांमध्ये उत्साह दिसून येत होता.