औरंगाबाद
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर या उपोषणाला उपस्थित हेते. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी संध्याकाली 4.30 वाजेच्यादरम्यान हे उपोषण मागे घेतले. उपोषणाची सांगता करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भाजप सोडणार या निव्वळ अफवा आहेत. त्याकडे कोणीच लक्ष देऊ नका.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मी भाजपा सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका.’ तसेच, यावेळी त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपच्या नेत्यांची आभारही माणले. कार्यकर्ते सध्या चांगलं वागत आहेत, विरोधात असताना तुम्ही चांगलं वागता का? त्यामुळे विरोधातच बसावं का? असा मिश्किल प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला. नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. मी 100 दिवसांत काही त्यांच्यावर टीका करणार नाही असेही पंकजा म्हणाल्या. मी मराठवाड्यात समाजसेविका म्हणून काम करणार. मराठवाड्यातल्या शेतकर्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला प्राणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसंच आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवा असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
दरम्यान पंकजा मुंडे यांनी हे सरकार विरोधातलं उपोषण नाही तर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. पंकजा मुंडे म्हणाल्या, राजकारणात येण्यापूर्वी पाण्यावर काम करत आहेत, मी भाजपची कार्यकर्ता आहे पण समाजसेविका म्हणून काम करणार, मला कोणती लालसा नाही, तुमच्या मनात माझं स्थान आहे ते सर्वोच्च आहे, मला अमेरिका राष्ट्राध्यक्ष दिलं तरी मला ते नको.
‘मी भाजपा सोडणार नाही’ फडणवीस, बागडे यांच्या साक्षीने पंकजा मुंडेंचे आश्वासन