व्हीजन अकादमीचा मास्टर्स अकादमीवर विजय

औरंगाबाद
विराज व युवराज क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत व्हीजन अकादमी संघाने मास्टर्स अकादमी संघावर 20 धावांनी विजय नोंदवला.
व्हीजन अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात आठ बाद 215 धावसंख्या उभारली. त्यात दिनेश पाटील (68) व पवन भांडोरे (56) यांनी आक्रमक अर्धशतके झळकावली. आशिष पवार व आयुष जाधव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मास्टर्स अकादमी संघाने धावांचा पाठलाग करताना 30 षटकात सहा बाद 195 धावा काढल्या. त्यात अमित पवारने नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी केली. संकेत पाटील (30), आशिष पवार (28) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज झटपट बाद होत गेल्याने त्यांना 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सुरज मुळेने दोन गडी बाद केले.
संक्षिप्त स्कोअरबोर्ड : व्हीजन अकादमी संघ : 30 षटकात आठ बाद 215 (दिनेश पाटील 68, पवन भांडोरे 56, अभिजीत भगत 23, ह्रषिकेश काटकर 13, इतर 28, आशिष पवार 2-27, आयुष जाधव 2-27, शेख मुबीन 1-31, झकी शेख 1-26) विजयी विरुद्ध मास्टर्स अकादमी संघ : 30 षटकात सहा बाद 195 (अमित पवार नाबाद 82, संकेत पाटील 30, आशिष पवार 28, पार्थ महाडिक नाबाद 17, इतर 21, सुरज मुळे 2-39, अभिजीत भगत 1-40, पवन भांडोरे. 1-20, तुषार पवार 1-22). सामनावीर : पवन भांडोरे.