दिल्ली ‘आप’ली केजरीवालांनी सत्ता राखली

21 वर्षांनंतरही भाजप अपयशी
काँग्रेसचा सुपडा साफ



नवी दिल्ली :संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांना तिसर्‍यांदा अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ ला पसंती दिली आहे. आपला 62 मते मिळाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या भाजपाला अवघ्या 8 मतांवर समाधान मानावे लागले. ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी एकदरीत ही निवडणूक लढवली गेली. तर काँग्रेस आणि अन्य यांना आपले खातेही उघडता आले नाही. महत्त्वाचे म्हणजे दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसर्‍यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी कामाच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली असून ही रामराज्याची नांदी असल्याचा दावा आपचे कार्यकर्ते करत आहेत. कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या दिल्लीला आर्थिक सक्षमता दिल्यामुळेच हा प्रचंड विजय मिळाल्याचा दावा करत आप कार्यकर्त्यांनी नागपुरातील कार्यालयात जोरदार जल्लोष केला आहे.
दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल सरकारवर विश्‍वास दाखवला आहे. विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. आपच्या कार्यालयात फुलांनी सजावट करण्यात आली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. रस्त्यारस्त्यावर आपचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून आले. आप कार्यकर्त्यांकडून पेढे, लाडू वाटप सुरु होते. तर एक छोटा आप समर्थक तर थेट अरविंद केजरीवाल यांच्या वेशभूषेत दिसून आला.



केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
निकाल स्पष्ट होताच विजयाचे हिरो अरविंद केजरीवाल यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. आपचा विजय निश्‍चित होता, मला या निकालाचं अजिबात आश्‍चर्य वाटलं नाही, असं म्हणतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचे कौतुक केले. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केजरीवालांना फोन करुन शुभेच्छा दिल्या, तर ‘देश जन की बात से चलेगा, मन की बात से नाही हे देशानं दाखवून दिलं. भाजपने केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले परंतु, त्यांना पराभूत करू शकली नाही’ असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या. देशभरातून केजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. तरी अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धी गावामध्ये केजरीवाल समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.


दिल्लीकरांनो आय लव्ह यू, हनुमानजींचेही आभार : अरविंद केजरीवाल
दिल्लीतील आपच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांनी माध्यमांशी संवाद साधला. केजरीवाल म्हणाले, सर्व दिल्लीवासीयांचे आभार. त्यांनी मला तिसर्‍यांदा निवडून देऊन ही संधी दिली. हा कामाचा विजय आहे, हा देशाचा विजय आहे, हा भारतमातेचा विजय आहे, असे केजरीवाल म्हणाले.  दिल्लीवालो आपने कमालही कर दिया, आय लव्ह यू, असे म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांवरील प्रेम जाहीर केले. दिल्लीकरांनी तिसर्‍यांदा त्यांच्या मुलावर विश्‍वास दाखवला. हा विजय त्या प्रत्येक कुटुंबाचा आहे ज्यांनी मला आपला मुलगा समजून पाठिंबा दिला. दिल्लीच्या नागरिकांनी देशात नव्या राजकारणात जन्म दिला आहे, ते म्हणजे कामाचं राजकारण
दिल्लीच्या नागरिकांनी देशाला संदेश दिला की, जो शाळा बांधेल, परिसरात स्वच्छता ठेवेल, विकासकामे करेल, त्यालाच मते मिळतील. हेच राजकारण देशाला 21 व्या शतकात घेऊन जाईल. आज मंगळवार आहे आणि हनुमानाचा दिवस आहे. हनुमानाचेही खूप खूप धन्यवाद, असं केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल यांनी पत्नीला अनोखं बर्थडे गिफ्ट दिले आहे. दिल्लीच्या मिसेस मुख्यमंत्री अर्थात सुनिता केजरीवाल यांच्या वाढदिवशीच दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. नवी दिल्ली मतदारसंघातून पुन्हा विजयी होत केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाची हॅट्रिक केली आहे.

भाजप मुख्यालयात भयाण शांतता
एरव्ही सदैव कार्यकर्त्यांच्या उत्साहाने भरलेले दिल्लीतील भाजप मुख्यालयात भयाण शांतता दिसून आली. दिल्ली विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर भाजप मुख्यालयाकडे कार्यकर्ते वळले नाही. आम आदमी पक्षाने सलग दुसर्‍यांदा मोठा विजय मिळवला आहे. आपने 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 7 जागांवर आघाडी घेतली. अंतिम निकाल घोषित होणार असले तरी ‘आप’ने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे आप कार्यालयात जल्लोष दिसून येत आहे. तर भाजपच्या मुख्य कार्यालयात भयाण शांतता पाहायला मिळत आहे. दरम्यान, कितीही प्रयत्न केले तरी भाजपला काय दिल्ली अजूनही गाठता आलेली नाही. 21 वर्षं झाली. पण दिल्लीचे तख्तं भाजप काबीज करु शकले नाही.