आयपीएलच्या वेळापत्रकास होतोय उशीर

मुंबई: आयपीएल 2020 मधील पहिला सामना 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईत होणार आहे. दुसरा 30 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब हा सामना दिल्लीत, तिसरा सामना बेंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार. आयपीएलचे हे संभाव्य वेळापत्रक जवळ जवळ 20 दिवसांपूर्वी सर्व संघांना देण्यात आले होते. पण अद्याप आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यात कोलकाता आणि दिल्लीत येणार्‍या पाहुण्या संघांच्या व्यवस्थापनात गोंधळ झाला आहे. यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने काही सामने गुवाहाटीला शिफ्ट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अर्थात यावर एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.
आयपीएलमधील सर्व कार्यक्रम लक्षात घेता संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध करण्यास कोणत्याच अडचणी नाहीत. तरी अद्याप वेळापत्रक प्रसिद्ध झाले नाही यामागे काही अन्य कारण असल्याचे बोलले जात आहे. स्पर्धेत सामन्यांचे नियोजन करताना आठवड्याच्या अखेरच्या दिवशी दोन सामने खेळवण्याचे प्रमाण कमी करण्याची शक्यता आहे.