कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. महाविकास आघाडीतर्फे उभा राहिलेल्या काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची मंगळवारी कोल्हापूरच्या महापौरपदी निवड झाली. भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने त्यांनी 48-1 असा दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांची गेल्या चार वर्षापासून कोल्हापूर महापालिकेत आघाडी आहे. कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजप-ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर उभ्या होत्या.आज सकाळी कोल्हापूर महापालिकेत महापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीचे कामकाज पार पडले. निलोफर आजरेकर यांना कोल्हापूरच्या 50 व्या महापौर होण्याचा मान मिळाला असून महापालिकेतील संख्याबळ पाहता आजरेकर यांच्या निवडीची घोषणा केवळ औपचारिकता होती. भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार अर्चना पागर यांना केवळ 1 मत मिळाले, तर आजरेकर यांना 48 मते पडली. महापौर निवडीसाठी भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते.