मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू पवई भागात एका वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा घरात घुसून त्यांची हत्या करण्यात आली होती. महिला गाठ झोपेत असताना ही हत्या करण्यात आल्याची माहिची पोलिसांनी दिली आहे. ज्यावेळी महिलेची हत्या झाली तेव्हा तिचा पती तेथे उपस्थित नव्हता. त्यानंतरही पोलिसांना त्यांच्या पतीविषयी कोणतीच माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे सर्व संशय महिलेच्या पतीवर जात आहे. याप्रकारत पोलीस हत्याचा तपास करीत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी घरात एक सुसाईट नोट सापडली आहे. ही सुसाईट नोट महिलेच्या पतीने लिहिली आहे. यामध्ये डोक्यावर कर्जा डोंगर आहे. मात्र ते पैसे मी फेडू शकत नाही. ही परिस्थिती सुधारणे मला शक्य नाही. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी मी पत्नीची हत्या केली आहे आणि आत्महत्या करणार आहे. या प्रकारात पोलिसांनी महिलेच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा नेमका खुलासा करण्यात येईल.
मुंबईतील उच्चभ्रू भागात वृद्धेची हत्या