चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडिओप्रकरणी दोन तरुण ताब्यात

पुणे : पुण्यामध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राज करण पट्टीलाल आणि मनोजकुमार झल्लार सरोज या तरुणांना अटक करण्यात आलीय. दोन्ही मजुरी करतात. त्यांनी सुमारे 100 ते 150 व्हिडीओज युट्युब वर अपलोड केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातून चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड झाल्याची माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाने पुणे पोलिसांना कळवली होती. त्यानुसार सायबर शाखेने ज्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून हे व्हिडीओ अपलोड झाले त्याच्या यु एल आर नंबर वरून आरोपींच शोध घेतला.
पुण्यातून हे व्हिडीओ अपलोड झाल्याची माहीती केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळाली होती. गुगलने ही माहिती केंद्र सरकारकडे ही माहिती दिली होती. आपल्या देशात 25 हजार चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड झाले असून पुण्यातून दिडशे व्हिडीओ अपलोड केल्याची यात माहिती होती. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. हे व्हिडीओ त्यांनी स्वत: तयार केले की कुठून घेऊन नंतर अपलोड केले आहेत का याचा तपास पुणे पोलीस घेत आहेत.