प्रतिनिधी
मुंबई
कॉन्फरन्स कॉल सुरू असतानाच पतीने तीन तलाक दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या महिलेने पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तापस करत आहेत.
सदर महिला कांदिवली पूर्वेला तिच्या आई-वडिलांसोबत राहते. तिचं लग्न एप्रिल 2018मध्ये झालं होतं. लग्नानंतर ती नवर्यासोबत कळंबोलीला राहत होती. सासू-सासर्यांसोबत भांडण झाल्यानंतर ही महिला आई-वडिलांकडे आली होती. त्यामुळे तिच्या बहिणीने मध्यस्थी करण्यासाठी बहिणीच्या नवर्याला फोन केला होता. हे तिघेही जण कॉन्फरन्सद्वारे बोलत असताना अचानक पीडित महिलेच्या नवर्याने तिला फोनवरच तीन तलाक दिल्याचं कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडित महिलेने तिच्या तक्रारीत अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख केला आहे. सासू-सासर्यांच्या मागणीनुसार माझ्या आई-वडिलांनी माझ्या नवर्याला एक गाडी आणि राडो घड्याळ दिले होते. लग्नाच्या काही दिवसानंतर त्यांनी पैसे मागायला सुरुवात केली. रोजच्या मानसिक आणि शारीरिक तणावामुळे माझा गर्भपातही झाला. मात्र यासाठी सासू-सासर्यांनी मलाच दोषी ठरवलं आणि माहेरून पैसे आणण्याची बळजबरी केली, असं या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. डिसेंबर 2018मध्ये गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात झाला होता, असं या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.