प प्रतिनिधी
उल्हासनगर
ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मलंगगडावरील रहदारीचा पूल कमकुवत झाला आहे. मात्र या कमकुवत पुलाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. मलंगगड यात्रा 8 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होत असल्याने यात्रेकरूंच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर पहिल्या समाधी मंदिराला लागून असलेल्या लोखंडी पुलाचे काम हे अत्यंत पुरातन असून जीर्ण झाले आहे. त्यावर केलेले सिमेंट काँक्रीटीकरण देखील ढासळत चालले आहे. मलंगगड यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या यात्रेत राज्यभरातुन लाखो भाविक दर्शनासाठी मलंगगडावर येत असतात.
ठाणे जिल्ह्यातील हे धार्मिक स्थान मलंगगड किंवा हाजी मलंग नावाने ओळखले जाते. या गडावर हजरत हाजी बखतावर शहाबाबा दर्ग्याजवळ एक चाळीस फूट पूल आहे. या पुलाच्या एका बाजूने खोल दरी आहे, पुलाला खालून लोखंडी खांबांचा आधार दिला परंतु ते लोखंडी खांब पूर्णपणे गंजून सडले असून मोडकळीस आले आहे. त्यामुळे इथे यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.प्रशासनाने तात्काळ हा पूल बनवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
हा परिसर हिल-लाईन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असून आमच्या पोलीस पथकाने प्रत्यक्ष जागेची पाहणी केली आहे, पुलाची परिस्थिती पाहून एक खबरदारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी बॅरिकेटस लावल्या आहेत, जो पर्यंत दुरुस्तीचे काम होत नाही तोपर्यंत भाविकांनी पुलाचा वापर करू नये अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. अशी माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली.