प प्रतिनिधी
मुंबई
खेळण्यांवरील आयात शुल्क 20 टक्क्यांवरून 60 टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी खेळणी व्यापारी येत्या 18 फेब्रुवारीला आंदोलन करणार आहेत. महात्मा जोतिबा फुले मंडई येथे दुकान बंद करून हे आंदोलन केले जाईल. मुंबई युनाइटेड टॉईज असोसिएशनच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. खेळण्यांवरील आयात शुल्क वाढवल्याने व्यापार्यांचे नुकसान होईल. तसेच खेळण्यांच्या किमतीत 50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. किमती वाढल्याने सर्वसामान्यांना खेळणी घेणे परवडणार नाही. परिणामी खेळण्याच्या व्यापार्यावर मंदीचे सावट येईल. त्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते.