प प्रतिनिधी
ठाणे
भिवंडी शहरात ‘तिहेरी तलाक’चा तिसरा गुन्हा शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी पीडित महिलेच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीत चव्हाण कॉलनी परिसरात राहणारी शर्मिक शेखचा (22) 14 फ्रेबुवारी 2019 रोजी शहरातील मानपाडा परिसरातील शुभारंभ कॉम्पलेक्समध्ये राहणार्या शारिक अफजल शेख याच्याशी विवाह झाला होता. मात्र, लग्नात हुंडा दिला नाही म्हणून गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून सासरची मंडळी पीडितेचा छळ करीत होती. दरम्यानच्या काळात पीडितेच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्या नातेवाईकांकडून 30 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर, दुचाकी व घर घेण्यासाठी वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिल्याने चिडलेल्या सासरच्या मंडळींनी तिला रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिली होती. तसेच दोन वेळा जबरदस्तीने रॉकेलही पाजले होते. खळबळजनक बाब म्हणजे, ही घटना तिच्या घरच्यांनाही कळू नये तसेच, पोलीस ठाण्यात तक्रारही करू नये म्हणून सासरच्यांनी तिच्यावर दबाव आणला होता. दरम्यान, ईद सणाकरीता पीडिता माहेरी आली असतांना पतीने तिला फोनवरून घरी येणार आहे का ? असे विचारले असता, तिने पतीला नकार दिला. याच गोष्टीचा राग येऊन पतीने फोनवर पत्नीला तीन वेळा ‘तलाक-तलाक-तलाक’ म्हटले. त्यानंतर पीडित पत्नीच्या आईने जावयाची समजूत काढल्याने पीडिता पुन्हा सासरी नांदण्यास गेली. मात्र, त्यानंतरही सासरची मंडळी तिला शारीरिक, मानसिक त्रास देत राहिले.