आणि विराट भडकला

बेंगळुरू: आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाच्या एका निर्णयाने सर्व क्रिकेट चाहत्यांना आणि खुद्द संघाचा कर्णधार विराट कोहली याला हैराण केले आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त स्टार असेलल्या या संघाने एकही विजेतेपद मिळवले नाही. आता बेंगळुरू संघ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
आरसीबी संघाने बुधवारी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवरील प्रोफाइल फोटो आणि नाव काढून घेतले. आरसीबीने अचानक फोटो काढून घेतल्यामुळे संघाच्या चाहत्यांसह क्रिकेटपटूंना देखील आश्चर्य वाटले.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या बेंगळुरूच्या संघाने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलचे नाव बदलले आहे. तसेच डिसप्ले आणि कव्हर फोटो देखील हटवण्यात आला आहे. तर नावात बदल करत रॉयल चॅलेंजर्स असे ठेवण्यात आले आहे. अशाच प्रकारचा बदल इंस्टाग्राम आणि फेसबुकवर देखील करण्यात आला आहे.