. प्रतिनिधी
सरकार कुठलंही असो तुमचा आमचा सामन्यांचा पैसा हमखास खर्च होतो. कारण मंत्र्यांना लागणारे चकचकीत बंगले, मंत्र्यांची दालनं यावर सध्या कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागानं ३१ बंगल्यांसाठी निविदा काढल्या आहेत. एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार त्यावर १५ कोटींचा खर्च होतोय. म्हणजे एका बंगल्यावर सध्या ८० लाख ते दीड कोटीपर्यंत उधळपट्टी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं ३१ बंगल्यासाठी निविदा काढल्या आहेत. पण आश्र्चर्याची बाब म्हणजे निविदा सादर होण्याआधीच बंगल्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांना खुश करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं बंगल्याची कंत्राट देण्यास सुरुवात केली आहे. एकूण ३१ बंगल्यावर जवळपास १५ कोटींची उधळपट्टी सुरु आहे म्हणजेच साधरणतः एका बंगल्यावर ८० लाख ते दीड कोटीपर्यंत खर्च सुरु आहे. सर्वात जास्त खर्च महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन आणि अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर होत आहे. कोट्यवधींची उधळपट्टी |
रॉयल स्टोन १ कोटी ८१ लाख रामटेक १ कोटी ४८ लाख मेघदूत १ कोटी ३० लाख १ कोटी ३३ लाख शिवनेरी १ कोटी १७ लाख अग्रधुत १ कोटी २२ लाख ज्ञानेश्र्वरी १ कोटी १ लाख पर्णकुटी १ कोटी २२ लाख । सेवासदन १ कोटी ५ लाख