प प्रतिनिधी
मुंबई
खर्च कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबईत पॉइंट टू पॉइंट विनावाहक बससेवा सुरू केली. मात्र, या बससेवेचा प्रवाशांसह वाहकांनाही मनस्ताप होत आहे, असा आरोप गुरूवारी भाजप सदस्यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला. या बससेवेबाबत तीव्र पडसाद बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. या सेवेतील त्रुटी दूर करण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाने सदस्यांना या वेळी दिले. मुंबईत 86 मार्गावर 549 विनावाहक बससेवा सुरू आहे. विनावाहक बससेवेसाठी वाहकाला बसथांब्यावर बराच काळ उभे राहावे लागत आहे. या सेवेत मधल्या मार्गावर बसगाड्यांना थांबा नाही. पहिल्या थांब्यावरून बस निघण्यापूर्वी वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर काही मोजक्याच बस थांब्यांवर बस थांबविण्यात येते. तेथे उपस्थित वाहकाकडून प्रवाशांना तिकीट दिले जाते. त्यानंतर बस थेट शेवटच्या थांब्यावर पोहोचते. विनावाहक सेवेमुळे वाहकांची तारांबळ उडत आहे. वाहक या बसगाड्यांसाठी एकाच ठिकाणी पाच ते सहा तास उभा राहतो. त्यामुळे प्रसाधनगृहातही जाता येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे, असे सदस्यांनी निदर्शनास आणले. विनावाहक बसगाड्यांच्या मागील दरवाजा बंद करण्यात येत असल्याच्या प्रकाराकडे भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी समिती सदस्यांचे लक्ष वेधले. बसगाड्यांना एकच दरवाजा असणे, वाहक नसणे हे योग्य नसून प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विनावाहक बससेवा बंद करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. विनावाहक बसगाड्यांमध्ये कमी प्रवासी असतात, तर काही गाड्यांमध्ये प्रवासीच नसतात. मात्र पॉइंट टू पॉइंट सेवा देताना मधल्या थांब्यांवरून त्यांना नियमानुसार प्रवासी घेता येत नाहीत.