प्रतिनिधी मुंबई राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय खात्यामार्फत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्याबरोबरच त्या विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व अन्य स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण व हक्काचा रोजगार देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय खात्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना प्राधान्याने राबविण्यासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक झाली. त्यात ही माहिती देण्यात आली. या बैठकीस सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्र्वजित कदम यांच्यासह पाण्याचा पुर्नवापर
शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात : रोहित पवार
आगामी लोकसभा निवडणुकीत आपण एकत्र लढलो तर मराठी माणूस पंतप्रधानपदी बसेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. ते मंगळवारी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार पंतप्रधान होण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. साहेब अजूनही तरूण आहेत. आपण एकत्र लढल्याने महाराष्ट्रात काम सोपे झाले. आता २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो तर मराठी माणसाला पंतप्रधान करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले. आता शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काही स्वयंसेवी संस्थांनी विविध रोजगारभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे सादरीकरण केले.