



मुंबई : व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलच्या (डब्ल्यूडब्ल्यूआय) 5 व्या वेदा सांस्कृतिक केंद्राच्या अकराव्या आवृत्तीचे उद्घाटन माधुरी दीक्षित नेने यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, ‘मला अभिनय पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देईल, म्हणून मी या क्षेत्रात आले नाही; तर मला कलेची आसक्ती होती. जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही झपाटून करता, तेव्हा सगळे काही मागाहून मिळत जाते. बाकीचे सगळे सुरळीत होते. जे काम हातात घेतले आहे, त्यात सातत्य राखा, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, एखादप्रसंगी अपयश आल्यास, मनाने हरून जाऊ नका. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवत असते.’ बालपणापासूनच संगीत आणि नृत्याची मला प्रचंड आवड होती. कलेविषयीची कायम असलेली ओढ आपल्या कारकिर्दीसाठी प्रेरणादायक ठरल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.