प्रतिनिधी
मुंबई ;कामगार कोणत्याही क्षेत्राचा का असेना त्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा गंभीर इशारा कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, अभिजीत राणे यांनी दिला. हा इशारा अभिजीत राणे यांनी द बार स्टॉक एक्सचेंजचे कर्मचारी पार्थो भट्टाचार्य यांनी दिलेल्या एका तक्रारीवर दिला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पार्थो भट्टाचार्य यांनी द बार स्टॉक एक्सचेंजचे मालक अमित सिंह यांच्याकडे उर्वरित पगार मागितला असता अमित सिंह यांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर पार्थो भट्टाचार्य यांनी कामगार नेते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांना भेटून आपल्यावरील अन्यायाबाबत दाद मागितली व न्याय मिळवून देण्याची विनंती केली. पार्थो भट्टाचार्य यांनी केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी रात्री १. वाजता द बार स्टॉक एक्सचेंजचे मालक अमित सिंह हे आपल्या काही बाऊंसरसह (सुरक्षा रक्षकांसह) हॉटेलमध्ये पोहचले. हॉटेलवर पोहचताच त्यांनी कर्मचारी पार्थो भट्टाचार्य यांना बोलवत किती पगार बाकी आहे? अशी विचारणा केली. त्यावेळी पार्थो यांनी ३ महिन्यांचा पगार बाकी असल्याचे सांगितले असताचं अमित सिंह यांना राग आला आणि त्यांनी पार्थो यांना तू इथे कामात भरपूर झोल गपगुमान काम कर अशी धमकी दिली. इतके बोलून अमित सिंह थांबले नाहीत तर त्यांनी पार्थो यांची कॉलर पकडत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पार्थों यांचा गळा दाबला यावेळी पार्थो यांनी आपली कशीबशी सुटका करुन घेण्यासाठी अमित सिंह यांना विनवणी केली की, साहेब मी गरीब आहे मला सोडा नाही तर मी मरून जाईन. यावर अमित सिंह उर्मट आणि उध्दटपणाणे पार्थो यांनी बोलले की तू मेलास तरी चालेल. मी तुला सोडणार नाही असे प्रत्त्युत्तर दिले. रात्री सुमारे साडे तीन वाजेपर्यंत पार्थो यांना अमित सिंह यांच्याकडून मारहाण होत होती. यादरम्यान पार्थो यांचा मोबाईल देखील त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला. धडक कामगार युनियनकडे दिलेल्या । पत्रात पार्थो भट्टाचार्य यांनी असे ही लिहिले आहे की, द बार स्टॉक एक्सचेंज मालक अमित सिंह मारहाण करुन थकले त्यावेळी अमित यांच्या सांगण्यावरुन साथीदार परवेज आणि विनोद दास पार्थो यांना मारहाण करत होते. मारहाण करताना ते असेही म्हणत होते की घे अजून किती पगार पाहिजे तुला. अमित सिंह यांच्या रोजच्या टोमण्यांना आणि त्रासाला कंटाळून कित्येकदा पार्थो यांनी रिजाइन लेटर देखील दिले होते. परंतु प्रत्येक वेळी अमित सिंह यांनी ते फाडून फेकून दिले. तसेच पार्थो यांनी ३ महिन्यांचा बाकी पगार आणि सर्विस चार्ज अमित सिंह यांच्याकडे मागितला त्यावेळी अमित सिंह यांनी मी पोलिस, एमएलए, बीएमसी, एक्साइज सगळ्यांना पैसा पुरवतो त्यामुळे माझे कोणी काही वाकडे करु शकत नाही असे उत्तर दिले. या सर्व त्रासाला कंटाळलेल्या पार्थो यांनी शेवटी धडक कामगार युनियनकडे यासंबंधीत घटनेचे प्रार्थना पत्र दिले. त्यानंतर राज्यातील अग्रगण्य कामगार युनियन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजित राणे यांनी पार्थो भट्टाचार्य यांना योग्य तो न्याय देऊनचं शांत राहणार असे आश्वासन दिले.