दिल्लीत दोघा भावांची घडली भेट

सीएएला घाबरण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे



वृत्तसंस्था नवी दिल्ली: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या बैठकीला कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान राज्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सीएए, एनपीआर आणि एनआरसीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन ते भाजपा ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यास गेले. सोनिया गांधी यांच्याबरोबर ५० मिनिटे आणि अमित शहांशी पाऊण तासांची भेट घेऊन ते मुंबईस परतले.


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दिल्ली दौऱ्यात उध्दव ठाकरे यांनी सर्व प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी उध्दव ठाकरेंसोबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात किमान सव्वा तास चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उध्दव ठाकरे यांनी दिल्लीत खासदर संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सीएए.. एनपीर आणि एनआरसीवर चर्चा झाली. सीएएमुळे कुणी घाबरण्याचं कारण नाही. सीएएद्वारे शेजारील देशात अल्पसंख्यांक असलेल्यांना नागरिकत्व देण्यात येतं. सीएएने कुणाचं नागरिकत्व काढण्यात येणार नाही, असं उध्दव ठाकरे म्हणाले. एनपीआरमध्ये काही गडबड असली तर त्यावेळी निर्णय घेऊ. तसंच एनआरसी हे उल्हासनगरमध्ये देशभारत लागू करण्यात नाहीए, असंही उध्दव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान मोदींशी राज्याचा निधी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली. केंद्राकडून राज्य सरकारला मिळणारा जीएसटीचा वाटा हा उशिराने येतो. तो वेळेत मिळावा, अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केल्याचं उध्दव ठाकरे म्हणाले. तसंच राज्यपाल आणि सरकामध्ये कुठलाही वाद नसल्याचं स्पष्टीकरण उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिलं. ___मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांची भेट घेत असतात. हा शिष्टाचार समजला जातो. या भेटीत मुख्यमंत्री हे आपल्या राज्याचे प्रश्नही पंतप्रधानांपुढे मांडतात. मात्र २५ वर्ष शिवसेना हा भाजपचा मित्रपक्ष होता आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने सरकार स्थापन केले आहे त्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. भार उल्हासनगरमध्ये ६ मजली