भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी

५ सामन्यांच्या मालिकेत 'व्हाईट वॉश' देणारा भारत पहिला



. वृत्तसंस्था नवी दिल्ली भारताने टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा ७ धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने मालिका ५-० ने आपल्या खिशात घातली. भारत पाच सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश देणारा पहिला देश बनला. यासोबतच टीम इंडिया सलग ८ सामने जिंकण्यात यशस्वी ठरली. तर न्यूझीलंडचा संघ सलग सहाव्या सामन्यात पराभूत झाला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी बाद १६३ धावा | केल्या होत्या. प्रत्युत्तरासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाला २० षटकांत ९ गडी बाद १५६ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाने मालिकेत न्यूझीलंडला एकाही सामन्यात विजय मिळवून दिला नाही. यूझीलंडच्या भूमीवर याआधी कोणत्याही संघाला द्विपक्षीय मालिकेत असा विजय मिळवता आलेला नाही. पाचव्या सामन्यात भारताने दिलेले १६४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची आघाडीची फळी अवघ्या १७ धावात माघारी परतली. पण त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेइफर्ट यांनी शानदार खेळी केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे रॉस आणि टिम यांनी दहाव्या षटकात ३४ धावा काढल्या. ही जोडी न्यूझीलंडला विजय मिळवून देईल असे वाटत असताना नवदीप सैनीने टिम सेइफर्टला बाद करत भारताला ब्रेक मिळवून दिला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेत न्यूझीलंडची अवस्था ७ बाद १३२ अशी केली. तर सैनीने न्यूझीलंडचा अखेरचा भरवश्याचा फलंदाज रॉस टेलरची विकेट घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडला २० षटकात ९ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारता आली. शत्याआधी कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. केएल राहुल आणि संजू सॅमसन यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. पण संजू सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो दोन धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित आणि राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागिदारी केली. राहल अर्धशतक करेल असे वाटत होते. पण तो ४५ धावा करून बाद झाला. राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर पायाला दुखापत झाल्याने रोहितला मैदानाबाहेर जावे लागले.