प्रतिनिधी
मुंबई बुधवारी मीरा-भाईंदर महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये महापौर आणि उपमहापौर पदी भाजपने विजय मिळवला आहे. भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे यांची महापौर पदी तर हसमुख गेहलोत यांची उपमहापौर पदी निवड झाली आहे. या महापालिकेत ९५ नगरसेवकांचे संख्याबळ असून भाजपाचे ६१, शिवसेना २२ आणि काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. महापौर निवडणूकीच्या रिंगणात भाजपच्या ज्योत्स्ना हसनाळे आणि शिवसेनेचे अनंत शिर्के यांच्यात लढत झाली. यामध्ये ज्योत्स्ना हसनाळे यांना ५५ मते तर अनंत शिर्केना ३६ मते मिळाली. यावेळेस भाजपच्या मोरस रोड्रिंक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे आणि वैशाली रकवी यांनी शिवसेनेला मतदान केले होते. तरी देखील भाजपच कमळ मीराभाईंदराच्या अंगणात फललं आहे. या निवडणुकीला ४ नगरसेवकांची गैरहजेर होते. भाजपचे विजय राय तर काँग्रेसच्या सारा अक्रम, शिवसेनेच्या अनिता पाटील आणि दीप्ती भट अनुपस्थित होते. मतदानासाठी एकूण ९१ नगरसेवकांनी उपस्थित होते.