'पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व'


 प्रतिनिधी


नवी मुंबई :नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्वबळाचा नारा दिला. पुढील निवडणुका भाजप विरुद्ध सर्व अशा होणार असल्याचे नड्डांनी ठणकावून सांगितले. महाजनादेशाचा अपमान करुन सत्तेत आलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची घोर फसवणूक करत आहे. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द या सरकारने दिला होता. पण तो शब्द पाळला नाही. आज राज्यात महिला असुरक्षित आहेत. राजरोसपणे महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारांना शिक्षेचा कनव्हिकशन रेट अतिशय उत्तम होता. त्यामुळे प्रत्येकाला कायद्याचा धाक होता. पण आज राज्यात कुणालाही कायद्याचा धाक राहिलेला नाही. महाराष्ट्रातील चित्र तुम्हाला पालटायचे आहे. एक गंभीर कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काम करायचं आहे. 'ऑल व्हर्सेस वन- भाजप' अशी तयारी तुम्हाला करायची आहे. आपल्याला एकट्याने विजयश्री यश्री मिळवायची आहे, कोणी भाजपला थांबवू शकणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो, असे जे पी नड्डा भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. जे पी नड्डा यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेसोबत पुनर्मिलनाच्या आशा मावळल्या आहेतच. मात्र आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसोबत भाजपची युती होण्याची मनसेसोबत भाजपची युती होण्याची शक्यताही धूसर झाल्याचं दिसत आहे. भाजपच्या अधिवेशनात महाविकास आघाडीविरोधात प्रस्ताव मांडण्यात आला.