प प्रतिनिधी
उल्हासनगर
अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सध्या भारताच्या भेटीला आले आहेत, ते अहमदाबाद येथे भेटीला आलेले असतांना झोपडपट्टी दिसू नये म्हणून सरकारने भिंती बांधल्या आहेत, सरकारची ही कृती गरिबांची थट्टा करणारी असून त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केला असल्याचा आरोप मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष अमर जोशी यांनी केला आहे, या घटनेच्या निषेधार्थ जोशी व त्यांच्या सहकार्यांनी मनपा मुख्यालयासमोर एक दिवसीय सांकेतिक उपोषण केले आहे.
अमेरिकन राष्ट्रपती हे अहमदाबाद येथील विमानतळावर उतरल्यानंतर रस्त्याने प्रवास करतांना विमानतळाजवळची झोपडपट्टी दिसू नये म्हणून केंद्र सरकार आणि गुजरातचे राज्य सरकार यांच्या इशार्यानंतर जवळपास अर्धा किलोमीटरची भिंत बांधण्यात आली आहे, त्याचप्रमाणें मोटेरा स्टेडियम जवळील काही जुनी घरे खाली करण्यात आल्याचा बातम्या आहेत असा आरोप अमर जोशी यांनी केला आहे, गरिबांची घरे झाकणे, त्यांची घरे खाली करणे हे मूलभूत हक्कांचे उल्लंघनआहे आणि सरकारने ते केले असल्याच्या निषेधार्थ आज अमर जोशी व त्यांच्या सहकार्यांनी मनपा मुख्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. या लाक्षणिक उपोषणात डॉ विवेक कोरडे, हेमंत कुमार, ऍड गिरीश कटारिया, रणजित गौड, मिनू कुरिओकोसे, काँग्रेसचे स्थानिक नेते रोहित साळवे , राधाचारण करोतिया हे देखील सामील झाले.
उल्हासनगर मनपासमोर लाक्षणिक उपोषण