वृत्तसंस्था
लखनऊ
उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी असलेला भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यासह 7 जणांना उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात आज कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकार्यांचाही समावेश आहे.
उन्नाव बलात्कार पीडिताच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी कुलदीपसिंग सेंगरसह सात दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टानेही 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात येईल, असेही कोर्टाने यावेळी सांगितले आहे.
या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोन पोलीस अधिकार्यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहेत. एक त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे एसएचओ होते, तर दुसरे त्यावेळी माखी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होते.
भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगर, तत्कालिन माखी ठाण्याचे सबइन्स्पेक्टर कामता प्रसाद, तत्कालिन माखी ठाणाचे एसएचओ अशो सिंह भदौरिया, विनय शर्मा, बीरेंद्र सिंह उर्फ बऊवा सिंह, शशी प्रताप सिंह उर्फ सुमन सिंह, जयदीप सिंह उर्फ अतुल सिंह यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आयपीसी कलम 304 (खून), 120 बी (षड्यंत्र), 166 (लोकसेवका जो आपले कर्तव्य बजावत नाही), 167 (हेतूपुरस्सर एखाद्याचे नुकसान करणे), 193 (खोटे पुरावे सादर करणे), 201 (गुन्हा करुन पुरावा लपवणे), 203 (खोटी माहिती देणे), 211 (हानी पोहचवण्याच्या उद्देशाने दुसर्याकवर खोटे आरोप लावणे), 218 (सार्वजनिक सेवेद्वारे खोटे पुरावे सांगणे), 323 (मुद्दाम एखाद्याला दुखापत केल्याबद्दल दंड) आदी दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला तीस हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.