कोरोनाची धास्ती ः 100वे अखिल भारतीय नाट्यसंमेलन पुढे ढकलले

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 70 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 14 रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक मोठे कार्यक्रम रद्द केले जात आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नाट्यसंमेलनही अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. 25 मार्च ते 14 जून दरम्यान यंदा शंभरावं अखिल भारतीय नाट्यसंमेलन होणार होतं. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे नाट्य संमेलन सध्या तात्पुरतं रद्द करण्यात आले असून अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.
भारतात कोरोनाव्हायरसच्या कोरोनाव्हायरसच्या रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून मिळाली आहे. शिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल 60 च्या वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात खळबळ माजली आहे. कर्नाटकातील कलबुर्गीमध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोनाव्हायरसची संशयित रुग्ण होती.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारनं 31 मार्चपर्यंत चित्रपगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय... दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केलीय. दरम्यान, दिल्ली सरकार या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. सार्जवजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पुणेकरांनी आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे, तसंच, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळलं पाहिजे, असे आवाहनही केले.
कोरोनाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही मोठा फटका बसला आहे कारण 60 टक्के परदेशी पर्यटकांनी ताडोबाचे बुकिंग जे आहे ते रद्द केलं आहे. परदेशी पर्यटकांनी ताडोबाचे बुकिंग रद्द केल्यामुळे किमान 2 हजार लोकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होणार आहे.
पंढरपूरचा विठ्ठलाला दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. आज मात्र मंदिर ओस पडल्याचं चित्र आहे. हजारो भाविकांची गर्दी असलेली दर्शनबारी देखील रिकामी आहे. भाविकांना आता थेट गाभार्‍यात जाता येणार आहे. इतरवेळी दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा अधवी लागतो. पण गर्दी रोडावल्याने आता भाविकांना केवळ 10 ते 15 मिनिटांमध्ये दर्शन मिळतंय.