मुंबई
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाला मोठा यश आले आहे. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासामध्ये आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. अखेर या हत्येप्रकरणातील पिस्तुल सापडले आहे. हे पिस्तुल अरबी समुद्राच्या तळातून शोधण्यात आल्याचे समोर येत आहे. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल नॉर्वेतील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शोधून काढलं आहे. या संदर्भात दोन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी माहिती दिली आहे.
या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. खारेगाव येथील सर्व परिसराची आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत तपासणी केली होती. लोहचुंबकाचा वापर करून या पिस्तुलाचा शोध घेण्यात आला. केंद्रिय गुन्हे अन्वेषण विभागाने या ऑपरेशसाठी पूर्ण तयारी केली होती. या ऑपरेशसाठी नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी 95 लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला. सध्या हे मिळालेले पिस्तुल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नाही हे स्पष्ट होईल.