भरदिवसा महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

प प्रतिनिधी
पालघर
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वसईमध्ये भरदिवसा राहत्या घरातच एका महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला घरात एकटीच असल्याचं पाहून दोन अज्ञातांनी घरात घुसून त्यांचा विनयभंग करत फोटो काढले. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, शोधमोहीम सुरू केली आहे. भरदिवसा अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय.
पीडित महिला ही पाच महिन्यांची गरोदर असून पोलीस भरतीचे क्लास घेते. घटना घडली त्यावेळी संबंधीत महिलेच्या घरात इतर कोणीच कुटुंबीय नव्हते. पीडित महिलेचे विवस्र अवस्थेतले फोटोही आरोपींनी काढलेत. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परिसरातील सीसीटीव्हींच्या आधारे पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील महिला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पीडित महिला ही पाच महिन्याची गर्भवती असून पोलीस भरतीचे क्लासेस घेतात. मात्र, रविवार असल्याने क्लासला सुट्टी होती. तर, पती कामावर गेले होते. त्यामुळे त्या एकट्याच घरी होत्या. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान घराची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी पती कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यावर ते कामावर गेल्याचे महिलेने सांगितले. मात्र, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, असे सांगत ते दोघे जबरदस्तीने घरात शिरले. त्यावर आज क्लासला सुट्टी आहे, तुम्ही उद्या या असं सांगितल्यानंतर पीडितेला धक्का देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन तिचे फोटोही काढले. घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.