बनावट मास्क विक्रीतून नागरिकांची लूट!

प प्रतिनिधी
मुंबई
राज्यातील कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन पदपथ, भेळपुरी दुकाने आणि किराणा दुकानांत बनावट मास्कची विक्री सुरू आहे. पुरेशी माहिती नसल्यामुळे नागरिक बनावट मास्क खरेदी करत आहेत.  त्यानंतरही पदपथांवर बनावट मास्कची विक्री सर्रास सुरू आहे. त्यातच भेळपुरीवाले आणि किराणा दुकानांतही 20 रुपयांपासून 35 रुपयांपर्यंत मास्क विकले जात आहेत. वडाळा व अन्य रेल्वेस्थानके, एसटी स्थानके, बाजार, गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर मास्कची विक्री सुरू असल्याचे दिसते. अनेक भागांत छोटी दुकाने आणि पदपथांवरही विक्रीसाठी मास्क मांडून ठेवल्याचे आढळते.