बंगळुरू : कोरोना व्हायरसने आता गुगलच्या कार्यालयातही घुसखोरी केली आहे. गुगलच्या बंगळुरू ऑफिसमधील एका कर्मचार्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. या तरुणाला तसे आधी सिमटर्मस दिसले होते. त्याची टेस्ट करण्यात आल्यानंतर कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झाले आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन गुगलने आपले बंगळुरूमधील कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. कोरोनामुळे गुगलच्या कार्यालयातील अनेक कर्मचार्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. 10 एप्रिलपर्यंत हे कर्मचारी घरी राहून ऑफिसचं काम करतील असे सांगण्यात आले आहे. हा कर्मचारी विदेश दौर्यावर जाऊन आला होता. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे. सुरुवातीला त्याला फक्त ताप आढळला होता. मात्र काही तासांनंतर कर्मचारी अस्वस्थ झाला त्याने डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. त्याच्या रिपोर्टमधून या कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
गुगलचे भारतातील कार्यालय बंद