प प्रतिनिधी
सातारा
खंबाटकी बोगद्याजवळ एस कॉर्नरला आज पहाटे पावणेसहाच्या सुमारास एक ट्रक कठड्यास धडकला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. त्यातील चार जण गंभीर जखमी आहेत. वाईमधून खंडाळा येथे बोअर मारण्यासाठी ट्रक निघाला होता. ट्रकमध्ये चालकासह 13 कामगार होते.
दरम्यान, नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक एस कॉर्नरवरील सिमेंटच्या कठड्याला धडकून पलटी झाला.
ट्रकमधील लोखंडी पाईप व कठड्याच्यामध्ये सर्व कामगार जखमी झाले. यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलीस त्याठिकाणी पोहचले असून महामार्ग पोलीस यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेतला आहे. मृत व जखमींना बाहेर काढून खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.