कामगार नेते अभिजीत राणेंचा दणका, व्यवस्थापनाला ७ दिवसांची मुदत
प्रतिनिधी कोल्हापूर घडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते अभिजीत राणे चगुरुवारी हॉटेल पर्ल, कोल्हापूरला भेट दिली. यावेळी अभिजीत राणे यांनी हॉटेल पर्लच्या व्यवस्थापनाबरोबर धडक कामगार युनियनचे नेतृत्व स्विकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनदरवाढीबाबत चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे अभिजीत राणे यांनी दिवाळीमध्ये हॉटेल पर्लमधील धडकचे नेतृत्व स्विकारलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनदरवाढीबाबत चर्चा केली होती. मात्र त्यानंतर कोणतीही अंमलबजावणी न झाल्यामुळे गरुवारी अभिजीत राणे यांनी याबाबत चर्चेसाठी कोल्हापूर गाठले. हॉटेल पर्लचे मालक कविता घाडगे, बाळासाहेब घाडगे आणि हॉटेल व्यवस्थापन यांच्याबरोबर अभिजीत राणे यांनी वर्ष २०१९२०२१ दरवाढीसंदर्भात चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली. यावेळी अभिजीत राणे यांनी येत्या ७ दिवसात अंतिम निर्णय घेण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा गंभीर इशाराही दिला. त्यानुसार अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा व्यवस्थापनाकडून सकारात्मक संकेत देण्यात आले. या चर्चेदरम्यान घडक कामगार युनियनच्यावतीने अभिजीत राणे यांच्याबरोबर आत्माराम गावकडकर, धडकचे कोल्हापूर युनिट अध्यक्ष धीरज पाटील, उपाध्यक्ष उमाकांत केसरकर, पर्ल हॉटेलमधील कर्मचारी उपस्थित होते.